गुळवेल किंवा गुडूची 

(शास्त्रीय नाव: Tinospora cordifoliaटिनोस्पोरा कॉर्डिफोलिया

हिला अमृतवेल म्हणतात. या वनस्पतीचे सत्त्व औषध म्हणून वापरतात. त्याला गुळवेलसत्त्व असे नाव आहे.

  • Latin name - Tinospora cordifolia Willd , कुळनाव-Menispermaceae
  • शास्त्रीय नाव - Tinospora Cordifolia (टिनोस्पोरा कॉरडीफोलिया)
  • कूळ - Menispermaceae
    (मिनीर्स्पमेसी)
  • संस्कृत नाव - गुडूची, ज्वरनाशिनी
  • हिंदी नाव - गिलोय
  • गुजराती नाव - गुलो
  • इंग्रजी नाव - हार्ट लिव्हड मूनसीड
  • स्थानिक नावे - वारुडवेल, अमृतवेल, अमृतवल्ली

गुळवेलीचे मराठी नाव 'गुळवेल'च आहे. पण चिकित्साप्रभाकर या आयुर्वेदिक ग्रंथात दिलेल्या महितीनुसार 'गरुड' 'गरोळ', 'गुडची' ही गुळवेलची आणखी काही मराठी नावे आहेत.

गुळवेलमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स, अँटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म आहेत. यामध्ये ग्लुकोसाइड, फॉस्फोरस, कॉपर, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे खनिजे देखील आहेत. हे घटक आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. आजारपणामध्ये प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर वाईट परिणाम होतो. गुळवेलीमधील इम्युनोमॉड्युलेटरी गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.रक्तातील वाढणारी शर्करा नियंत्रित ठेवण्याचे कार्य गुळवेल करते. गुळवेलीमुळे मधुमेहासारखे घातक आजार धोका कमी होतो. बदलती जीवनशैली, धावपळीमुळे आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुळवेलचं सेवन करावे. यामुळे रक्तदाब आणि पचनाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते.

कॅन्सर, ज्वर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, नेत्र विकार, पंडुरोग, प्रमेह, मधुमेह, मूत्रविकार, यकृत विकार, रक्तशर्कराविकार, वमनविकार, संग्रहणी, सर्दी पडसे, हृदयविकार, आदी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.

या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरिन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरिन गिलोइन, गिलोनिन ही रासायनिक गुणद्रव्ये आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानांत आला आहे.

गुळवेलीचे खोड चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असते. गुळवेलीच्या अनोख्या गुणांमुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये या वनस्पतीचा उपयोग करतात. अशक्तपणा, कावीळ, कृमींचा त्रास, जुलाब, पोटातील मुरडा, मधुमेह, मूळव्याध, संधिवात, हगवण अशा निरनिराळ्या व्याधींमध्ये गुळवेलीचा उपयोग होतो. त्यामुळे गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात 'अमृतकुंभ' म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या विषाणूला दूर ठेवण्यासाठी तुम्ही घरामध्ये आयुर्वेदिक पेय तयार करू शकता. यासाठी तुम्हाला कालमेघ, चिरायता पावडर, गुळवेल, तुळशीची मंजिरी आणि ज्येष्ठमध ही सामग्री लागेल. एका पॅनमध्ये ग्लासभर पाणी उकळत ठेवा आणि सर्व सामग्री एक-एक चमचा या प्रमाणात पाण्यात मिक्स करा. पेय नीट उकळल्यानंतर गाळून घ्या आणि थंड होऊ द्या. तुम्हाला हवे असल्यास यामध्ये तुम्ही मधाचा समावेश करू शकता. या पेयामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.