Photo by DocuSign on Unsplash

खुप दिवसापासून प्रेम करतो मी 

पण सांगता येत नाही,

एकाकी असलो जेव्हा मी 

साथ दयायला  तुच येणारी,

झोपेत जरी असलो मी 

स्वप्नात माझ्या तुच येणारी 

गाढ़ झोपेतुन मला 

उगाच मला उठवनारी,

तुच आहेस ग माझी रानी 

काय झालय मला ठाऊक नाही 

व्यसन लागल मला तुझ

बस एवढच कळल... 

प्रेम आहे खुप माझ तुझ्यावर 

कदाचित तुला ते कळणार नाही,

तु खुश आहेस स्वत:मध्ये  तर ,

मी ही तुला सांगणार  नाही

पण खरच सांगतो ग मी तुला,

मनापासून प्रेम करतो मी

पण सिद्द करता येणार नाही.