Medisanal Plant

  • संस्कृत-अर्जुन, अर्जुनसादडा, अर्जुनाव्हय, इन्द्रू, ककुभ, देवसाल, धनंजय, धाराफल, धूर्तपाद्य, नदीसर्ज, पार्थ, शक्रतरू, क्षीरस्वामी, सर्पण, सेव्य, वगैरे
  • हिंदी-कौहा, कोह
  • बंगाली-अर्जुन
  • गुजराती-अर्जुन
  • मल्याळम-मारुत
  • तामिळ-मारुड
  • तेलुगू-मदिचट्ट
  • इंग्रजी- The White Murdah Tree
  • लॅटिन नाव-(टरमीनैलीया अर्जुना)Terminalia arjuna
  • कुळ - (कॉम्ब्रीटेसी) Combretaceae
  • इंग्रजी नाव:Terminalia Arjuna (Roxb.) W.& A.Combretaceae 

                       अर्जुनाची साल पांढरट, किंचित लालसर वर्णाची असते. अर्जुनाच्या सालीचा चटकन तुकडा पडतो. त्यात तंतुमय रेषा नसतात. त्यामुळे त्याचे चूर्ण एकदम गुळगुळीत शंखजिरे चूर्णासारखे असते. अर्जुन वृक्ष ६० ते ८० फूट उंच असणारे तपस्वी ऋषींसारखे उभे असतात. मध्य प्रदेशात अर्जुन वृक्ष हा संरक्षित वृक्ष म्हणून वनखात्याच्या अनुज्ञेविना तोडता येत नाही. विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात अर्जुनाचे वृक्ष खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. अर्जुनाला पंख्यासारखी छोटी फळे वा बिया असतात. त्या रुजवून त्यांची रोपे सहज करता येतात. अर्जुनाची झाडे नदी, ओढे यांच्या काठावर उतारावर लावल्यास अधिक चांगली रुजतात. अर्जुनाची सालच प्रामुख्याने औषधी प्रयोगाकरिता वापरली जाते. वजनाने ती हलकी असते, अशी ही साल तुरट रसामुळे घट्ट बनलेली असते.
                
            आयुर्वेदानुसार अर्जुनाची साल हृदयरोगावर गुणकारी आहे. तसेच त्याच्या फुलांपासून उत्तम नेत्रांजन बनते. अर्जुनासव व अर्जुनारिष्ठ औषधे सालीपासुन बनवतात. अर्जुनची साल दुधासोबत ही खूप गुणकारी आहे पण ती वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी. मुकामार, हाड तुटणे याच्या सालीचा वापर होतो . कमी झालेला रक्तदाब वाढण्यासाठी व हृदयाचे आकारमान वाढले असल्यास अंर्तसालीचा वापर करावा .


चेहऱ्यावरील वांग, सुरकुत्या, काळे डाग जातील झटकन निघून, फक्त हा घरगुती रामबाण उपाय करा

1) अर्जुन साल : अर्जुन साल ही आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होत असते. अर्जुन सालीचे उपयोग आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सांगण्यात आले आहेत. वांग कमी करण्यासाठी अर्जुन सालीचा लेप लावला. तर आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच अर्जुन सालीचे उपयोग इतर आजारांसाठी देखील करण्यात येतात.

2) मंजिष्ठ : मंजिष्ठ देखील आयुर्वेदामधील एक अतिशय चांगली वनस्पती आहे. याचा उपयोग आपण यासाठी करणार आहोत. इतर आजारांवर देखील मंजिष्ठा चा वापर करण्यात येतो. मंजिष्ट पावडर आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे.

3) लोणी : लोणीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषण तत्वे भरलेली असतात. आपल्या चेहर्यासाठी लोणी हे अतिशय चांगले असे असते. त्यामुळे या उपायसाठी आपण लोणी देखील वापरणार आहोत.

4) मध : मधामध्ये मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिक गुणधर्म असतात. या उपयसाठी आपण मध देखील वापरणार आहोत. मध आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होऊन जातो.