नेहमी तू सोबत असताना
त्याचा माझ्यावर वर्षाव व्हावा
असा पाऊस मला हवाय .....
नेहमी जस ..तुझ्या प्रेमाने..,
माझ्या मनातील दु:ख वाहून निघत ,,
तसं..नद्यातून पाणी वाहून नेणारा
असा पाऊस मला हवाय .....
कधीच ..आकाशात आभाळ दाटून आलय..,
तसं..माझ मनही दाटलय
कधी या मनाच्या मेघाला ..
तुझ्या प्रेमाचा गारवा मिळेल
अन..कधी हा मेघ बरसेल...
असा पाऊस मला हवाय ...
अरे.. कळू देत त्या मेघाला..,
अश्रू आवरेनासे झालेत मला
पड म्हणावं एकदाच ...
अन ..कर माझ्या अश्रूंना आपलंस
नाहीतर कळेल तिला..,
मी तिच्या विरहात रडल्याच...
असा पाऊस मला हवाय ..........
क्षणभर सुद्धा तिच्याविना न राहणारा मी...
तिच्याविना कसा राहतोय...,
ज्याला नेहमी पाऊस हवा असे
त्याच्या नयनातून पाऊस येतोय..
असा पाऊस मला हवाय ....


0 टिप्पण्या