prempatra
Photo by John-Mark Smith from Pexels

प्रिये,

 माझे प्रेम तुझ्याशिवाय शाई नसलेल्या पेनासारख झाल आहे. आणि माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय असे काहीच नाही हे तुला सांगण्यासाठी मी पत्र लिहित आहे. मला तुझी खूप आठवण येते.

तुझ्याशिवाय माझ आयुष्य खूप दु:खी, एकटे आणि कष्टाने भरले आहे .

मनाला माझ्या कळले आहे की तुच मला जिवंत आणि आनंदी ठेवु शकते. मी अजूनही तुझ्या प्रेमात आहे. तू मला आणखी एक संधी देशील का ?

मला वाटले होते की मी तुझ्या आयुष्यापासून स्वत:ला  दुर राहण्याची सवय लावून घेईन, पण एकटा असतो तेव्हा डोक्यात अनेक विचार येतात. आपण एकत्र घालवलेल्या सर्व चांगल्या क्षणांची आठवन  डोळ्यासमोर जशीच्या तशि येत असते. जणू काही ती वेळ परत आलेली आहे असे वाटते. तुझी आठवण आली की दिवस न संपणारा आणि रात्र वीरान वाटत असते. तुझ्याशिवाय जीवनात मी अपुर्ण आहे. आणि  मला होणारा त्रास हा फ़क्त मलाच होतो अस नाही तुला पण तेवढाच होतो म्हणून तु माझ्या जीवनात येउन मला पुर्ण कर. मला तुझ्या सुख दु:खात सामावुन घे आज पासुन तुझे सर्व दुःख माझे व सर्व माझे सुख तुझे. मला आपल्या जीवनाला स्वर्गापेक्षा सुन्दर बनवायच आहे फ़क्त मला तुझ्या एका संधीची वाट आहे. देणार न मला एक संधी. तुलाही तसंच वाटत असेल तर माझ्याकडे परत ये अशी मी विनंती करतो.

मी माझ्या अंत:करणातुन तुझ्यावर प्रेम करतो तु येईपर्यंत मी तुझी वाट पाहत राहणार आहे.

 

                                                            तुझाच प्रेमी