भारतात पिंपळाची पूजा करतात. पिंपळाच्या झाडाचे जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या पिंपळाच्या झाडांचे महत्त्व जाणून घेऊया.
पिंपळ हा पानझडी वृक्ष मोरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव फायकस रिलिजिओजा आहे. पिंपळ मूळचा भारत, बांगला देश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि चीन या देशांतील आहे. वड व उंबर हे वृक्षदेखील मोरेसी कुलातील आहेत. मात्र पिंपळाला वडाप्रमाणे पारंब्या नसतात. भारतात हा वृक्ष अनेक गावांमध्ये मंदिराच्या आवारात तसेच पश्चिम बंगाल व मध्य प्रदेश येथील वनांमध्ये आढळून येतो.
पिंपळ वृक्ष सुमारे ३० मी. उंच वाढतो. पाने साधी, एकाआड एक व हृदयाकृती असून टोकाला निमुळती असतात. पानांचे देठ लांब असून पाने लोंबती असतात. उन्हाळ्यात पाने गळून पडतात. मात्र, त्याच वेळी नवीन पालवी येते. कोवळी पाने तांबूस तपकिरी असून ती नंतर हिरवी होतात. फुले उंबराप्रमाणे घागरीसारख्या आकाराच्या कुंभासनी फुलोऱ्यात येतात. फुलोऱ्यात नर-फुले आणि मादी-फुले असतात. परागण कीटकांमार्फत होते. फळ औदुंबरिक प्रकारचे असून जांभळे किंवा काळे असते. पक्ष्यांमार्फत बियांचा प्रसार होतो. पक्ष्यांच्या विष्ठेतून पिंपळाचे बी कोठेही नेले जाते. ते रुजून पिंपळाची झाडे अनपेक्षित ठिकाणी उगवलेली दिसतात.
पिंपळाचे लाकूड मजबूत नसल्यामुळे घरबांधणीसाठी वापरत नाहीत. मात्र त्यापासून खोकी, आगपेट्या, फळ्या इ. तयार करतात. जळणासाठीही ते वापरतात. साल स्तंभक असते. फळे सारक असून बिया शीतक असतात. दमा, मधुमेह, आमांश, पोटाचे विकार तसेच चक्कर येणे यांवर हा वृक्ष गुणकारी आहे, असा उल्लेख आयुर्वेदात आहे.
पोटदुखी
पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल.
अस्थमा
पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा. आणि हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खा. अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल.
साच्या त्रासावर गुणकारी
बऱ्याच जणांना श्वासाचा अथवा दम्याचा त्रास असतो. त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या सुक्या फळांचा उपयोग करून घेऊ शकता. पिंपळाची सुकी फळं तुम्ही वाटून घ्या आणि साधारण 2-3 ग्रॅम या प्रमाणात 14 दिवस पाण्यातून सकाळ - संध्याकाळ तुम्ही घ्या. यामुळे श्वासाचा आजार आणि खोकलादेखील निघून जातो.
तापावर गुणकारी
सेक्शुअल स्टॅमिना वाढवण्यासाठी
पिंपळाची फळं आणि सालं दुधामध्ये घालून उकळवा. त्यामध्ये साखर आणि मध मिसळून प्यायल्यास, सेक्शुअल स्टॅमिना वाढतो. तसंच पिंपळाची फळं अथवा मूळ सुंठीसह मिसळून दुधात घालून उकळून घ्या आणि तेदेखील तुम्ही पिऊ शकता. तसंच यामध्ये खडीसाखर अथवा मध मिसळून तुम्ही सकाळ संध्याकाळ खाल्ल्यास, शारीरिक कमतरता निघून जाते.
जुलाब
पिंपळाची वेल, धणे अथवा खडीसाखर याचा समसमान भाग तुम्ही एकत्र करून घ्या. रोज सकाळ संध्याकाळ साधारण 3-4 ग्रॅम तुम्ही हे मिश्रण खाल्ल्यास, तुम्हाला नक्की लाभ होईल. तुम्हाला जुलाबाचा त्रास होत असल्यास, लगेच त्याचा चांगला परिणाम दिसून येईल.
टायफॉईड
टायफॉईड हा नक्कीच गंभीर ताप आहे. यावरील उपाय म्हणून तुम्ही पिंपळाच्या सालीचा उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्ही पिंपळाच्या सालीचं चूर्ण करून घ्या. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन वेळी तुम्ही मधासह हे चाटण खा. यामुळे तुमचा टायफॉईड निघून जायला मदत होते.
क्षयरोग
क्षयरोग हादेखील एक गंभीर आजार आहे. वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. मुळात हा आजार झाल्यानंतर तुम्ही घाबरून जायची अजिबात गरज नाही. यावर अनेक उपाय आहेत. त्यापैकी एक म्हणजे पिंपळाचं मूळ. याचं रोज सेवन केल्यास, क्षयरोगाच्या रूग्णांना त्याचा फायदा होतो. क्षयरोग बरा होण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
जखमेवर उत्तम उपाय
पिंपळाच्या पानांची पेस्ट तुम्ही जखमेवर चोळून लावली तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिंपळामुळे रक्त शुद्ध होतं. तर तुमची जखम भरून निघण्यासदेखील मदत होते.
त्वचेवरील लालसरपणा होतो दूर
त्वचेवर बऱ्याचदा हवेतील वातावरणाने अथवा प्रदूषणामुळे लालसरपणा निर्माण होत असतो. पण तुम्ही त्यावर पिंपळाच्या पानाच्या पेस्टचा वापर नियमित केल्यास, तुमचा हा त्रास निघून जाण्यास नक्कीच मदत होईल. त्याशिवाय तुमच्या त्वचेवर फोडही येणार नाहीत.
त्वचेवरील पुरळांवर ठरते फायदेशीर
तुमच्या शरीरावर येणाऱ्या लहानमोठ्या पुरळांवरीलदेखील पिंपळाची पानं फायदेशीर ठरतात. पिंपळाची साल पाण्यात घालून तुम्ही पुरळ आलेल्या ठिकाणी लावा आणि त्यावर ओली पट्टी बांधा त्याचा तुम्हाला फायदा मिळतो. तसंच पिंपळाची ताजी पानं तुम्ही गव्हाच्या पिठात घालून पेस्ट बनवल्यास, ती त्यावर लावा. यामुळे पुळ्या आणि त्यामुळे आलेली सूज निघून जाण्यास मदत होते.


0 टिप्पण्या