
Photo by freestocks.org from Pexels
प्रेमपत्र..
प्रिय,
खरं तर मला हा अधिकार आहे की नाही,
हे ठरायचे आहे.
तरी मी तुला प्रिय म्हणतो. कारण यानंतर तो कदाचित मला अधिकार मिळू शकेल, किंवा मिळणारही नाही.
म्हणूनच प्रिय......
मी यापूर्वी कधीच असे पत्र लिहिलेले नाही. कदाचित
इतक्यांदा मला प्रेम झाले नसेल, किंवा तुला आता पत्र पाठवण्याची हिच योग्य वेळ असेल म्हणून.
म्हणूनच मी तुला हे पत्र लिहितोय.
गेल्या तीन महिन्यापासून आपण एकमेकांना ओळखतो. आपल्यात चांगली मैत्री आहे. नकळत दररोज एकमेकांना आपण भेटतो,
आणि एसएमएस,
नेट चॅटींगही
करतो. जोपर्यंत आपण एकत्र असतो, तोपर्यंत एक वेगळाच आनंद माझ्या
मनाला स्पर्श करत असतो. तो मी आता पत्रांतून मांडू आणि सांगू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे.
पण आज अचानक तू, नाही मी, नाहीच मुळी, पावसाने तुझी आठवण करून
दिली. मी खिडकी बाहेर डोकं काढलं, आणि मला असा भास झाला. तुझ्या सगळ्या शरीरात मला
तुझे डोळे खूप आवडायचे हे डोळे तसेच आहेत जसे अंधार्या रात्री गाडीचे हेडलाइट, ज्यांना माणुस सर्वात आधी बघतो. तु हे नको समजु की तुझे डोळे खूपच सुंदर आहेत. अस नाही मी सुंदर आणि कुरूप मध्ये फरक करू शकतो. पण माफ कर, या डोळ्याच्या बाबतीत एवढच बोलू शकतो की ते सुंदर आहेत पन
त्यांच्यात एक वेगळीच कशिश आहे. तुझे ते हास्य आणि तुझे डोळे
या दोघात मी पावसाच्या टपोऱ्या थेंबांप्रमाणे एकमेकात गुंतत, एकमेकांना आधार देत, आणि एकमेकांच्या
भावनांमध्ये चिंब भिजत जातेय. मला तुझी इतकी आठवण आली की चक्क, ते पावसाचे थेंब माझ्या
पापण्यांना ओलावून गेले.
मन जड झालं, आणि एक विचित्र अस्वस्थता मला जाणवू लागली, वाटलं, आता सारी बंधनं तोडावीत,
चटकन फोन उचलून
तुला फोन करून मनातील साऱ्या भावना व्यक्त कराव्यात आणि सांगून टाकावं...... मला
तू खूप आवडतेस.... इतक्यातच वीज कडाडली, शुद्ध आली. वाटलं हे सारं मी केल्यावर जर
तू नाही म्हटलीस तर....? तर मी ते एक्सेप्ट करू शकेल?
तुला माझ्या बद्दल काय वाटेल? तू म्हणशील यासाठी तू माझ्याशी
मैत्री केलीस? यासाठी तू माझी इतकी काळजी घ्यायचास?
या प्रश्नांनी माझे दोन दिवस वाया गेले. आणि मग
ठरवलं, काही
झालं तरी तुला जे खरं आहे, ते सारे सांगायचे. अगदी सारे काही.......
एसएमएस पाठवण्याचे धाडस मी केले नाही, कारण त्यातून समज कमी
परंतु गैरसमज जास्त होतात. आपण दोघांनीही ते अनुभवले आहे.. मग सर्वात चांगले साधन
म्हणजे पत्र. आणि म्हणूनच आज मी तुझ्यासमोर या पत्रातून माझ्या भावना व्यक्त करत आहो.
सारे वाचून जरा विचित्र वाटेल परंतु प्लीज मला समजून घे. हे पत्र वाचल्यानंतर तुला जर राग आला तर प्लीज.. प्लीज मला तू सांग. हवं तर शिव्या दे, माझ्यावर रागव, पण अबोला धरू नकोस...!
तुझा नकार एकवेळ मोठ्या मुश्किलीने मी पचवू
शकेन गं, पण
तुझा अबोला, तो नाही माझ्याच्यानं सहन होणार.....!
तुझ्या उत्तराची वाट पाहतोय...........!
तुझाच प्रेम वेडा प्रेमवीर

0 टिप्पण्या